महाराष्ट्र
बीडच्या जिल्हाधिकारी पदी राधाबिनोद अरीबम शर्मा
विकास माने | बीडच्या जिल्हाधिकारी पदी राधाबिनोद अरीबम शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे तातडीने बदलीचे आदेश दिल्याने आता बीड जिल्हाधिकारी पदाचा चार्ज शर्मा घेणार आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले शर्मा यांना बीड जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश आज काढले असून जिल्हाधिकारी शर्मा यांना तातडीने रुजू होण्याबाबत कळविण्यात आले आहे.
दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी न्यायालयाचा अवमान केला असा ठपका ठेवत, त्यांना तातडीने बदलीचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार ही बदली झाली आहे.