G7 Summit | इंग्लंडच्या राणीचा ‘स्वॅग’… तलवारीने कापला केक!
वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याच्या घटना आपण कायम ऐकत असतो. यातील अनेकांवर कारवाई झाल्याचंही समोर येतं. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे. मात्र यंदा तलवारीने केक कापलाय, ते इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी!
जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडच्या राणीच्या हस्ते केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी चाकू असतानाही राणीने तलवारीने केक कापला. हा व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या राष्ट्रांचा सहभाग असलेली जी-७ परिषद सुरू आहे. नैर्ऋत्य इंग्लंडमध्ये तीन दिवसांची ही परिषद चालणार असून, या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 'द डचेस ऑफ कॉर्नवाल' लोकांनी एकत्र यावं, सोबत जेवण करावं आणि मित्रत्वाचे संबंध दृढ करावे, अशा उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.