काका विरुद्ध पुतणे संघर्ष पुन्हा ताणला; महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची जहरी टीका

काका विरुद्ध पुतणे संघर्ष पुन्हा ताणला; महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची जहरी टीका

Published by :
Published on

विकास माने | काका विरुद्ध पुतणे संघर्ष पुन्हा तापला आहे. पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय झाली आहे. अशी जहरी टीका काका नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केलीय.

शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केलं? असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा… असा थेट घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर काका भारतभूषण क्षीरसागर यांनी केला.

तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. 35 वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे. माझे वय 60 वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार व्हायचं म्हणालो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गॅंग झाली आहे. परळीत, बारामती आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com