ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ताबा आज पुणे पोलीस घेणार

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा ताबा आज पुणे पोलीस घेणार

पुणे ड्रग्ज माफिया ललित पाटलाचा ताबा आज पुणे पोलीस घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे ड्रग्ज माफिया ललित पाटलाचा ताबा आज पुणे पोलीस घेणार आहेत. साकीनाका पोलीस स्टेशनमधील गुन्हा त त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर साकीनाका पोलीस त्याला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे.

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणे आणि ड्रग्जची विक्री करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे ललित पाटील याच्यावर आहेत.

या दोन्ही गुन्हाच्या तपासासाठी पुणे पोलीस ललितचा ताबा घेणार आहेत. ललित पाटीलचे इतर साथीदार सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. ललित पाटीलचा पुणे पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टीचा खुलासा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com