पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले आहे.
Published on

पुणे : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात भावपूर्ण निरोप भक्तांनी दिला आहे.

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन
पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजाची जंगी मिरवणूक

कसबा गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक मार्गाने सकाळी दहा वाजता निघाली. दुपारी ४.३५ वाजता या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदा या मंडळाच्या मिरवणुकीत प्रभात बँडपथक, कामायनी प्रशाला आणि बँक ऑफ इंडियाचे पथक होते.

यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी पावणेपाचच्या सुमारास विसर्जन झाले. तर, गुरुजी तालीम गणपतीचे पावणेसहाच्या दरम्यान विसर्जन करण्यात आले आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे साडेसहा वाजता विसर्जन झाले आहे. तसेच, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे सात वाजता विसर्जन करण्यात आले आहे.

दरम्यान, रंगावलीच्या मनमोहक पायघड्या, बँडपथकातील वादकांचे सुमधूर वादन, विविध तालाचा आविष्कार घडविणारे ढोल-ताशा पथकातील कलाकारांचे वादन अशा उत्साहपूर्ण वातावरणात नऊ तासांनी या मानाच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली आहे. यावेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली. मात्र, गणेश भक्तांचा उत्साह कायम दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com