Pune Kidney Racket Case
Pune Kidney Racket CaseTeam Lokshahi

Pune kidney racket: बनावट किडनी प्रत्यारोपणाच्या ५ केसेस उघड

ठाणे आणि कोईम्बतूर येथे किरडनी रॅकेटचे प्रत्योरोपण
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे :

पुण्यात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा (Pune kidney racket) पर्दाफाश लोकशाही न्यूजने केला होता. आता रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उघड झाली आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आले आहे.

पुण्यात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा (Pune kidney racket) पर्दाफाश लोकशाही न्यूजने केला होता. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आता रूबी हॉल क्लिनिकची (Ruby Hall Clinic) मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्राची मान्यता रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. पुण्याबाहेत तामिळनाडू पर्यंत या प्रकरणाची धागेदोरो पोहचले आहे. ठाणे आणि कोईम्बतूर येथे किरडनी रॅकेटचे प्रत्योरोपण झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात 15 डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

काय आहे प्र्करण

कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेची किडनी तस्करी (Pune kidney racket) रूबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) करण्यात आली होती. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचं आमिष दाखवून रविभाऊ नामक किडनी तस्करांनी ही तस्करी केली होती. या प्रकरणात लोकशाही न्यूजने सर्वप्रथम तस्करीची बातमी दाखवत प्रशासनाला सवाल केले होते. या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा लोकशाही न्यूज करुन प्रशासनावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com