अट्टल चोरटे गजाआड, शेतकरी पंपांची चोरी पडली महागात

अट्टल चोरटे गजाआड, शेतकरी पंपांची चोरी पडली महागात

Published by :
Published on

मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पोलिसांनी लालू दुधवडे, भरत दुधवडे आणि देवराम काळे अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून शेतकऱ्यांच्या मोटर पंपाची केबल तसेच इतर साहित्य जप्त केलं असून एकूण 77 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून थेट मंदिरात चोरी होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com