सोशल मीडियावर ‘भाई’ बनू पाहणारा थेट तुरुंगात, गुन्हे शाखेचा फटका

सोशल मीडियावर ‘भाई’ बनू पाहणारा थेट तुरुंगात, गुन्हे शाखेचा फटका

Published by :
Published on

फिल्मी डायलॉगसह बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने अटक केली आहे. आकाश राजाराम भिसे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आरोपी आकाश भिसे याने लोखंडी कोयता बेकायदेशीर बाळगला. तसेच कोयत्यासह व्हिडिओ तयार केला. 'तूम कानून तोड रहे हो… पुरानी आदत है युवर ऑनर… वो तो बचपनसे कर रहा हूं…', असे फिल्मी डायलॉग असलेल्या व्हिडीओ कोयत्याचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवरून व्हायरल करत दहशत निर्माण केली. यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com