कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उद्या भारत बंदची हाक
गेल्या अनेक दिवसांपासून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावेत, ही प्रमुख मागणी आहे. उद्या २६ मार्च रोजी संपूर्ण भारतबंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंद यशस्वी करावा, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. आंदोलनाला 120 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारत बंद पुकारण्यात आला आहे.
सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत देशभरातील सर्व रस्ते आणि रेल्वे वाहतूक, सर्व बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील. तथापि, ज्याठिकाणी निवडणुका होणार आहेत त्याठिकाणी बंदची गरज नाही. हा भारत बंद यशस्वी करून देशवासियांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे.
केंद्र सरकारनं ३ नवीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे तिन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कायद्यांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करू, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. मात्र, दुरुस्ती नको तर कायदे रद्द करावेत, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.