महाराष्ट्र
Civil Hospital विरोधात अनोखे आंदोलन, भीक मागून रुग्णांना सेवा देण्यासाठी दिले पैसे गोळा करून
सांगली सिविल हॉस्पिटलमध्ये कर्नाटक, सोलापूर, कोल्हापूर, आदी जिल्ह्यातून रुग्ण येत असतात. मात्र डॉक्टरांनी याचा गैरफायदा घेऊन सांगली सिविलमध्ये येणाऱ्या रुग्णांची आणि एका पद्धतीने राजरोसपणे लुबाडणूक चालू केली आहे.
संजय देसाई : सांगली शहराला पद्मभूषण वसंतदादा पाटील नावाने सिविल हॉस्पिटल (Civil Hospital) लाभले आहे. या सांगली सिविल हॉस्पिटलमध्ये कर्नाटक, सोलापूर, कोल्हापूर, आदी जिल्ह्यातून रुग्ण येत असतात. मात्र डॉक्टरांनी याचा गैरफायदा घेऊन सांगली सिविलमध्ये येणाऱ्या रुग्णांची आणि एका पद्धतीने राजरोसपणे लुबाडणूक चालू केली आहे.
त्यामध्ये सिटीस्कॅन, एम आर आय, सोनोग्राफी, रक्त तपासणी स्टॅंडर्ड एक्स-रे प्रायव्हेट मेडिकल अशा चिठ्या देऊन अशा विविध पद्धतीने रुग्णांच्या व नातेवाईकांच्या डोळ्यात धुळ फेकली जात आहे. 233 कोटी 34 लाख निधी येऊन सुद्धा कागदावरच सुविधा मिळतात. याचा दलित महासंघतर्फे निषेध करत विविध मागणीसाठी दलित महासंघ यांच्यावतीने भिक मागून विविध सुविधा तात्काळ चालू करा या मागणीसाठी भिक मागून अनोखे आंदोलन केले.