Muharram 2021 । मिरवणुका काढण्यास परवानगी नाही; नियमावली जाहीर

Muharram 2021 । मिरवणुका काढण्यास परवानगी नाही; नियमावली जाहीर

Published by :
Published on

मुंबईत कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. तसेच यानिमित्त नियमावलीही जाहीर कऱण्यात आली आहे.

मोहरमनिमित्त विविध ठिकाणी 'कत्ल की रात' आणि 'योम-ए-आशुरा' निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहे.तसेच मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

वाझ/मजलीसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम काढू नयेत. सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोरोना संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com