कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पृथ्वीराज पाटीलने मुंबई पूर्वचा विशाल बनकरचा पराभव केला आहे. 5-4 गुणांचा असा निकाल आला असून पृथ्वीराज पाटील एका गुणाने विजय झाला आहे.
महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर (Vishal Bunkar) यांच्यात आज अंतिम लढत झाली होती. ही अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली होती. अंतिम लढतीत 5-4 गुणांचा असा निकाल आला असून पृथ्वीराज पाटील एका गुणाने विजय झाला आहे. पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकरला चितपट करत मानाची गदा उचलत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
कोण आहे पृथ्वीराज पाटील ?
पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.