Prithviraj Chavan : लोकशाही मराठीवरील कारवाईनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Prithviraj Chavan : लोकशाही मराठीवरील कारवाईनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया म्हणाले...

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मीडियाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून सुरू आहेत. लोकशाही मराठीवर झालेल्या कारवाईचा निषेध. लोकशाहीने अत्यंत निर्भीडपणे काही गोष्टी समोर आणल्या आहेत.

लोकशाही मराठीने शोध पत्रकारिता केली होती. लोकशाही मराठीला सातत्याने त्रास दिला जात होता. अनेक वाहिन्या आहेत त्यांच्याही अनेक चुका आहेत पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. निस्पृहपणे पत्रकारिता करणाऱ्या माध्यमा विरोधात सुड भावनेने कारवाई केले जाते. देशातील लोकशाहीलाच धोका निर्माण झाला आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com