कैद्यांना मिळतोय पॅरोलवरील रजांचा बोनस

कैद्यांना मिळतोय पॅरोलवरील रजांचा बोनस

Published by :
Published on

कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून कारागृहातील पक्क्या कैद्यांना पॅरोलवर (संचित रजा) सोडण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने येथील विशेष कारागृहातील गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या ८ कैद्यांना ४५ दिवसाच्या पॅरोलवर सोडण्यात आले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे; मात्र कोरोना महामारीचा संसर्ग अजूनही कायम असल्याने या आठ कैद्यांना टप्प्या-टप्प्याने ३० दिवसांच्या जादा संचित रजेंचा बोनस मिळाला आहे. कारागृह व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना महामारी सुरू झाली आणि झपाट्याने संसर्ग वाढत गेला. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि शासनाने अनेक प्रयत्न केले. काही महत्त्वाचे निर्णय घेतले तरी शहर आणि ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढतच गेला. या विषाणूने कारागृहदेखील सोडली नाही.

हळुहळू हा या विषाणूचा कारागृहांमध्ये शिरकाव झाला. कारागृहातील बॅरेकमध्ये अनेक कैदी असल्याने संसर्ग झपाट्याने वाढू लागला. अखेर शासनाने आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत पक्क्या कैद्यांना ४५ दिवसाच्या पॅरोलवर (संचित रजा) सोडण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी विशेष कारागृहातीतल ८ कैद्यांचा यामध्ये सामावेश आहे. या कैद्यांना ४५ दिवसाची रजा देण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजून कायम आहे. त्यामुळे शासनाने आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कैद्यांना ३० दिवसांची वाढीव रजा मंजूर केली. टप्प्या-टप्प्याने आपत्ती निवारण कायद्यामध्ये शिथिलता येत नाही तोवर ही रजा द्यावी लागणार आहे. आठ कैद्यांपैकी एकानेही कैद्याने संचित रजा नाकारली नाही. सर्वांनी त्याचा फायदा घेतला आहे. कैद्यांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचे शासनाचे घालून दिलेले सर्व नियम काटेकोर पाळले जात आहेत. कारागृहात संसर्ग होणार याची याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com