chandrapur
chandrapur Team LOkshahi

'दम मारो दम' बिडी,सिगारेटसाठी कैद्यांचा थेट उपोषणाचा इशारा; अखेर मागणी मान्य

तुरुंगातील कैद्यांनी थेट न्यायाधीशांनाच लिहिले पत्र
Published by :
Sagar Pradhan
Published on

अनिल ठाकरे|चंद्रपूर: कोरोना काळात बंद झालेला बिडी, सिगारेटचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, यासाठी तुरुंगातील कैद्यांनी थेट न्यायाधीशांनाच पत्र लिहिले.केवळ पत्र लिहून थांबले नाहीत तर थेट उपोषणाचा इशारा दिला.मग काय उपोषणाची धास्ती घेतलेल्या कारागृह प्रशासनाने कैद्यांची मागणी मान्य केली.आता पुन्हा कारागृहात 'दम मारो दम' सुरू होणार आहे.

chandrapur
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत भाजपचे 'मिशन 2024'

चंद्रपूर येथे ३३३ क्षमतेचे जिल्हा कारागृह आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी येथे शिक्षा भोगत आहेत. या बंदिवानांना कारागृहातील कॅन्टिनच्या माध्यमातून सुमारे १८० वस्तू दिल्या जातात. त्यात तंबाखू, बिडी, सिगारेटचासुद्धा समावेश आहे. परंतु, दोन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजविला होता. कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी धुम्रपान हे सुद्धा एक कारण समजण्यात आले. त्यानंतर बंदिवानांना देण्यात येणारे बिडी, सिगारेट बंद करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. राज्य शासनाने सर्व नियम आता शिथील केले आहेत. एक ते दीड वर्षांपूर्वी तंबाखू देणे सुरू केले. परंतु, बिडी, सिगारेट दिली जात.

कॅन्टिनमधून बिडी, सिगारेट, अगरबत्ती, नारळ यासह अनेक वस्तुंचा पुरवठा केला जात नाही. तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही. त्यामुळे यासर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा 7 सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदन बंदिवानांनी जिल्हा सत्र न्यायाधीशांनी लिहिले. या निवेदनावर सुमारे ३९ बंदिवानांच्या स्वाक्षरी आहेत. या उपोषणाची आणि पत्राची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक श्री. जगताप यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बंदिवानांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी बिडी, सिगारेट उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन कैद्यांना दिले. त्यानंतर उपोषणाचा निर्णय मागे घेण्यात आला. श्री. जगताप यांनी त्यांची मागणी तातडीने मंजूर केली. आपली मागणी पूर्ण झाल्याची माहिती होताच कैद्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. टाळ्या वाजवून कारागृह प्रशासनाचे आभार मानले.

chandrapur
ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, खैरेंची नवनीत राणांवर जहरी टीका

कारागृहातील बंदिवानांनापूर्वी ४ हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू घेण्यात येत होत्या. आता हा आकडा ६ हजार करण्यात आला आहे. कॅन्टीनच्या माध्यमातून या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन आणि एक स्थायी वैद्यकीय अधिकारी अशा तीन डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा दिली जात आहे. बिडी, सिगारेटसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, ही मागणी पूर्ण केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com