Narayan Rane Arrest | राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल – विनायक राऊत
खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल मंगळवारी सकाळी पाठविलेल्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. ते पत्र गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठविल्याचा पीएमओचा खा. राऊत यांना फोन आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन रत्नागिरी सत्र न्यायालयाकडे निघाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले.
मला अभिमान वाटतो, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दहा मिनिटात त्या पत्राची दखल घेतली. दुपारी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला आणि मला सांगितलं पंतप्रधान बैठकीत व्यस्त आहेत. तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोला, तुमचं तक्रार पत्र मी अमित शाह यांच्याकडे पाठवलं आहे. नारायण राणे यांनी जनाची नाही, तर मनाची लाज राखून ताबडतोब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.", असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.