गाळप केलेल्‍या उसाला FRP प्रमाणे भाव द्या – रमेशअप्पा कराड

गाळप केलेल्‍या उसाला FRP प्रमाणे भाव द्या – रमेशअप्पा कराड

Published by :
Published on

वैभव बालकुंदे | शासनाच्‍या नियमानुसार गाळप केलेल्‍या ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी आज मांजरा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले. भाजपचे दार रमेश कराड Ramesh Karad यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले असून मांजरा परिवारातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्‍येनी सहभाग घेतला होता.

गाळप केलेल्‍या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव देण्‍याचे शासनाचे बंधन असून मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास -२ आणि रेणा साखर कारखान्‍यांनी आतापर्यंत केवळ प्रतिटन २२००/- रूपये याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव दिला आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे होणारी रक्‍कम आणि प्रत्‍यक्ष दिलेली रक्कम यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी आ. रमेशअप्पा कराड Ramesh Karad यांनी केली आहे.

कराड Ramesh Karad पुढे म्हणाले की, गाळपासाठी ऊस दिलेले सर्वजण कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आहेत. FRP प्रमाणे त्यांना भाव मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा मोबदला मिळालाच पाहिजे ही त्यांची आग्रही भुमिका आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com