सचिन वाझेच्या नियुक्तीचा दबाव; वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितला चांदिवाल आयोगाचा अहवाल
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता.मात्र या आरोपावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी लोकशाही न्युजवर मोठा खुलासा केला. परमबीर सिंह यांनी खंडणी गोळा करण्यासाठी सचिन वाझेला पथकात नियुक्ती केल्याचा गौप्यस्फोट इंद्रपाल सिंह यांनी केला.तसेच इंद्रपाल सिंह यांनी चांदिवाल आयोगासमोरचा सचिन वाझेचा जबाब वाचून दाखवला.
इंद्रपाल सिंह म्हणाले, परमबीर सिंह आणि वाझे यांच्यात 25 वर्षापासून मैत्री आहे. वाझे यांची नियुक्ती ही परमबीर सिंह यांनी केली असल्याचे माहीती त्यांनी दिली.त्याचसोबत सचिन वाझेचा चांदिवाल आयोगासमोरचा जबाबही सांगितला. 22 नंबरच्या जबाबात सचिन वाझे नियुक्तीवर बोलतात, मला माहितीय कमीटीवर कोण आहेत ते.. कोणी माझी नियुक्ती केली ते, कमिश्नर ऑफ पोलीस, जॉइंट कमिश्नर ऑफ पोलीस, अॅडीश्नल कमिश्नर ऑफ पोलीस यांनी माझी नियुक्ती केली असल्याचे वाझे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा कुठलाही हात नाही. त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत त्यात काही तथ्य नाही नसल्याचे म्हणत परमबीर सिंह यांचे आरोप इंद्रपाल सिंह यांनी फेटाळले.
इंद्रपाल सिंह पुढे म्हणाले, वाझे आणि परमबीर सिंह एकमेकांना ओळखत आहे. वाझे आहे खंडणी बहाद्दर आहे. खंडणी पथकात त्याची नियुक्ती झाली. त्या नियुक्तीतून त्याला सीआययुची बढती मिळाली. ती कधी एपीआयला आपण देऊ शकत नाही ? हा प्रश्न निर्माण झाला होता. एपीआय सीआययुचा कधीही हेड होऊ शकतो का ? नाही होऊ शकत, सीनीयर पीआय किंवा पीआय त्यांचे हेड असतात. पण सचिन वाझेला खंडणी गोळा करण्यासाठी खंडणी पथकात नियुक्ती केल्याचा इंद्रपाल सिंह यांनी सांगितले.
वाझेंचा पोलीसांवर मानसिक छळाचा आरोप….
सचिन वाझे यांनी पोलीसांकडून शारीरीक मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला. या आरोपावर बोलताना वकील इंद्रपाल सिंह यांनी चांदिवाल आयोगासमोरचा 30 नोव्हेंबर 2021रोजी झालेल्या उलट तपासणीचा संपुर्ण जबाब सांगितला. सचिन वाझेने मला महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस,मुंबई पोलीसांकडून मानसिक त्रास दिला नसल्याचे चांदिवाल आयोगासमोर सांगितले.तसेच देशमुखांवर लावलेले आरोपात किती सत्यता आहे. यावर त्यांनी माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशी माहीती चांदिवाल आयोगासमोर दिली. तसेच एनआयएने माझ्यावर दबाव टाकल्याचे वाझेने सांगितले.