“समृद्धी महामार्गाचं गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार”
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. लवकरच समृद्धी महामार्गाच्या सर्व्हेला देखील सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. समृद्धी महामार्ग गोंदियापर्यंत यावा यासाठी वाटचाल आम्ही सुरू केलेली असून नक्कीच त्याचा सर्व्हे आणि अलायमेंट कसा करायचा याची चर्चा झाल्याची माहिती पटेल यांनी दिली.
यासाठी आवश्यक लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर समृद्धी महामार्गाला गोंदिया जिल्ह्यापर्यत विस्तारीत करण्यात आलं, तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत हा महामार्ग जोडून गोंदिया टू मुंबई प्रवास सोपा होईल, असे ते म्हणाले.