Air Pollution in Pune due to Fire Crackers
Air Pollution in Pune due to Fire CrackersTeam Lokshahi

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पुण्यातील प्रदुषणाने गाठला उच्चांक

पुण्यात लक्ष्मीपुजनादिवशी सर्वाधित फटाके फुटले असल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीपुजनादिवशी पुण्यात अतिसूक्ष्म कणांची पातळी 210 वर पोहोचली.
Published by :
Vikrant Shinde
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

दिवाळी सणानिमित्त देशभरात फटाके फोडून दिवाळी सण साजरा केला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू व ध्वनीप्रदुषणामुळे फटाके फोडण्याला विरोध केला जातोय. पुण्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पुण्यातील वायुप्रदुषणाने उच्चांक गाठला आहे. यंदा पुण्यात लक्ष्मीपुजनादिवशी अतिसूक्ष्म कणांची पातळी 210 वर गेली.

Air Pollution in Pune due to Fire Crackers
मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा घेत दोन नराधमांनी तिला...

काय असते अतिसुक्ष्म कणांची पातळी?

१०० पर्यंतची अतिसूक्ष्म कणांची पातळी उत्तम समजली जाते. त्यानंतर १०० ते २०० समाधानकारक, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट, तर ४०० ते ५०० या प्रमाणात अतिसूक्ष्म कणांची हवेतील पातळी ही अतिधोकादायक समजली जाते.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्री 12 पासुन ते सकाळी 9 पर्यंतची हवेतील अतिसूक्ष्म कणांची पातळी ही 210 इतकी नोंदवण्यात आली आहे. मागील २ वर्षांत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही पातळी सरासरी ५० ते १०० इतकी होती. यंदाच्या वर्षी या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com