प्रजासत्ताक दिन : राज्यातील 57 पोलिसांचा पदकांनी गौरव
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त देशातील एकूण 946 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पुरस्कारप्राप्त एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 57 पोलिसांचा समावेश आहे. 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, 13 पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदक आणि 40 जणांना गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल पोलीस पदके देण्यात येणार आहेत.
अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर देवेंद्र पोटफोडे यांना विशेष सेवा पदक तर, इन्चार्ज चीफ फायर ऑफिसर संजय पवार, असिस्टंट स्टेशन ऑफिसर धर्मराज नाकोद आणि लीडिंग फायरमॅन राजाराम केदारी यांना गुणवत्तापूर्ण कार्य पदक प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मानकरी
विशिष्ट सेवा पदक : प्रभात कुमार (अप्पर पोलीस महासंचालक), सुखविंदर सिंग (अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन), निवृत्ती तुकाराम कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), विलास बाळकू गंगावणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक).
शौर्य पदक : राजा आर (आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक), नागनाथ पाटील (पोलीस उपनिरीक्षक), महादेव मडवी (एनपीसी), कमलेश अर्का (एनपीसी), हेमंत मडवी (पोलीस कॉन्स्टेबल), अमुल जगताप (पोलीस कॉन्स्टेबल), वेल्ला अत्राम (पोलीस कॉन्स्टेबल), सुधाकर मोगालिवार (पोलीस कॉन्स्टेबल), बियेश्वर गेडाम (पोलीस कॉन्स्टेबल), गजानन पवार (पोलीस निरीक्षक), हरीबालाजी एन (आयपीएस), गिरीश ढेकळे (एनपीसी). निलेश धुमणे (एनपीसी).
पोलीस पदक : डॉ. रवींद्र शिसवे (सहायक पोलीस आयुक्त पुणे), प्रवीणकुमार पाटील (पोलीस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव, (पोलीस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर, (दहशतवादविरोधी पथक, सायबर सेल, नवी मुंबई), संगीता शिंदे-अल्फान्सो (पोलीस उपायुक्त, जात पडताळणी समिती), दिनकर मोहिते (पोलीस इन्स्पेक्टर, सीबीडी, बेलापूर), मेघ:श्याम डांगे (पोलीस इन्स्पेक्टर, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई, (पोलीस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब छाननी समिती), विजय डोळस (पोलीस इन्स्पेक्टर, निजामपुरा पोलीस स्टेशन), रवींद्र दौंडकर (पोलीस इन्स्पेक्टर, वाशी), तानाजी सावंत (पोलीस इन्स्पेक्टर, कोल्हापूर), मनीष ठाकरे (पोलीस इन्स्पेक्टर, अमरावती शहर), राजू बिडकर (पोलीस इन्स्पेक्टर, डी. बी. मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई), अजय जोशी (पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलीस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलीस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलीस इन्स्पेक्टर खंडणीविरोधी पथक ठाणे), रमेश नागरूरकर (राखीव पोलीस दल, मुख्यालय, बुलडाणा), सूर्यकांत बोलाडे असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, रेल्वे पोलीस घाटकोपर), लीलेश्वर वारहडमरे (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, चंद्रपूर), भारत नाले (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, वाहतूक शाखा, सातारा), हेमंत राणे (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, शीव पोलीस ठाणे, माटुंगा, मुंबई), रामदास गडेकर (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, एमआयडीसी वाळुंज, औरंगाबाद), हेमंत पाटील (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, रिडर शाखा, रायगड), अशोक मांगलेकर (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, रिडर शाखा, अमरावती), जीवन जाधव (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, सीआययू शाखा, मुंबई), राजेंद्र मांडे (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, कर्जत, रायगड), विजय बोरीकर (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर), पुरुषोत्तम बरड (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, अमरावती), उदयकुमार पालांडे (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, क्राइम ब्रॅन्च, उल्हासनगर, ठाणे), थॉमस डिसोझा (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, मुख्यालय, ठाणे), प्रकाश चौगुले (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, क्राइम, रेल्वे, मुंबई), सुरेश मोरे (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, क्राइम ब्रॅन्च, ठाणे), संजय साटम (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, बीडीडीएस, सिंधुदुर्ग), शकीर जिनेदी (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड), संजय पवार (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, क्राइम ब्रॅन्च, नवी मुंबई), शारदाप्रसाद मिश्रा (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, अंबाझरी पोलीस स्टेशन, नागपूर), प्रकाश अंदिल (असिस्टंट पोलीस सबइन्स्पेक्टर, एसआऱपीएफ, जालना), जयराम धनवल (इंटिलिजन्स ऑफिसर, औरंगाबाद), राजू उसेंडी (इंटिलिजन्स ऑफिसर, सिरोंचा).