तृतीयपंथी समाजाचा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

तृतीयपंथी समाजाचा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

साताऱ्यात तृतीयपंथी समाजाच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Published by :
Team Lokshahi
Published on

प्रशांत जगताप |सातारा : साताऱ्यात तृतीयपंथी समाजाच्यावतीने पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कराड येथे तृतीयपंथी समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली असून मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कराड आणि साताऱ्यातील तृतीयपंथी समाजाने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

तृतीयपंथी समाजाचा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Shivsena : आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटणार? शिंदे गटाच्या बैठकीला 'इतके' खासदार उपस्थित

या लोकांना तृतीयपंथी समाजाचा गुरू समजणाऱ्यांकडून मारहाण केली जात आहे. तृतीयपंथीयांना मारहाण करून त्यांची केस कापण्यात आले असून त्यांच्या जवळील रोख रक्कम देखील काढून घेतली असल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला आहे. व मारहाण करणाऱ्यांस तात्काळ अटक करण्याची मागणी तृतीयपंथीयांकडुन करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com