राज्यात पोलीस दलातील 7231 पदांची भरती लवकरच : दिलीप वळसे पाटील

राज्यात पोलीस दलातील 7231 पदांची भरती लवकरच : दिलीप वळसे पाटील

Published by :
Published on

राज्यातील 5297 पदांची पोलीस भरती (Police Constable Recruitment) अंतिम टप्प्यात आहे. तर 7231 पदांची भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

राज्यातील पोलीस विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) पदाच्या भरतीसंर्भात आज दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती (Police Constable) अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात पोलीस भरतीची (Police Constable) प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. तर, काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरु आहे. तर, येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया दिवसात पूर्ण करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

तर महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची (Police Constable) भरती येत्या काळात सुरु करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, असं दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

गैरप्रकार टाळणार

महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल, असं दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी 7231 पदांची भरती करण्यात असल्याचं सांगितलं आहे. ही भरती होताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com