महाराष्ट्र
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
येथील अंतरवली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे.
जालना : येथील अंतरवली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. तर, गावकऱ्यांकडून दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
जालन्याच्या अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चाचं उपोषण सुरु आहे. उपोषणा दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याचे आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.