कल्याणमध्ये पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला; चोरी व भीक मागण्यांसाठी लहान मुलांचा वापर

कल्याणमध्ये पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला; चोरी व भीक मागण्यांसाठी लहान मुलांचा वापर

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांच्या मदतीने दोन लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला आहे.
Published by :
shweta walge
Published on

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांच्या मदतीने दोन लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला आहे. चोरी आणि भीक मागण्यासाठी या मुलांचा वापर केला जाणार असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी चार मुलांना अपहरण करणाऱ्या चार आरोपींना ठोकल्या बेड्या आहेत.

अंबरनाथ येथील अखिलेश प्रसाद मिश्रा यांचा नऊ वर्षाचा सूरज आणि सहा वर्षाचा सत्यम या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले होते, पोलिसांनी सीसीटीव्ही च्या मदतीने तातडीने तपासून केले पोलिसांना माहिती मिळाली की कल्याण बस डेपोतून या मुलांना आरोपींनी बसमध्ये बसवले होते, पोलिसांनी तातडीने तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलांचा पाठलाग केला, अखेरीस पालघर येथील कासा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि मुलांची सुटका केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी, आणि चंदा गोसावी यांचा समावेश आहे, हे चौघे मिरज, सांगली येथील असून, सराईत चोर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com