Pod Taxi In BKC: पॉड टॅक्सीला लवकरच दाखवणार हिरवा कंदिल; वांद्रे-कुर्लादरम्यान धावणार सुसाट
Pod Taxi In Bandra-Kurla Complex: परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉड टॅक्सी आता वांद्रे- कुर्ला संकुलातील (बीकेसी) रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. कुर्ला ते वांद्रे या दरम्यान होणारी वाहतूक समस्या आणि नागरिकांना वाहतूक समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारने बीकेसीमध्ये पॉड टॅक्सीची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यासाठी एक हजार 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यासाठी एक हजार 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान ही पॉड टॅक्सी धावणार आहे. सहा प्रवासी क्षमता असलेली पॉड टॅक्सी ताशी 40 किलोमीटर वेगानं धावेल आणि वाटेत 38 थांबे असतील, असे मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. पॉड टॅक्सी ही एक टेक्निकल कार आहे, जी उर्जेच्या मदतीनं चालते. ही पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी असणार असून त्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
1. पॉड टॅक्सी मार्गाची लांबी 8.8 किमी असणार आहे.
2. टॅक्सीचा मार्ग कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक असणार आहे.
3. या पॉड टॅक्सीसाठी एकूण 38 स्थानके असणार आहेत.
4. पॉड टॅक्सीचा वेग 40 किमी प्रतितास असा असेल.
5. पॉड टॅक्सीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 6 प्रवासी इतकी असेल.