POCSO : मुलीचा हात पकडून प्रपोज करणे हा लैगिक अत्याचार नाही – न्यायालय

POCSO : मुलीचा हात पकडून प्रपोज करणे हा लैगिक अत्याचार नाही – न्यायालय

Published by :
Published on

पोक्सो कोर्टाने लैंगिक अत्याचाराप्रकरणी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीचा हात पकडून प्रेमाची कबूली देणे हे लैंगिक अत्याचार मानले जाऊ शकत नाही, असं मुंबई पोक्सो कोर्टाने म्हटलं आहे. एका २८ वर्षीय आरोपीने २०१७ मध्ये एका १७ वर्षांच्या मुलीचा हात पकडून तिला प्रपोज केलं होतं. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती.

कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं की, असा कोणताही पुरावा नाही, ज्यामुळे सिद्ध होईल की आरोपीचा हेतू लैंगिक अत्याचार करण्याचा होता. असे कोणतेही पुरावे नाहीत ज्यातून सिद्ध होईल की, आरोपी वारंवार पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने तिला एखाद्या निर्जन ठिकाणी अडवले किंवा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी बळाचा वापर केला.

टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे. लैंगिक अत्याचारसंदर्भात फिर्यादी अत्याचार झाल्यासंबंधी कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने यावर टिप्पणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com