पंतप्रधान मोदींचा केदारनाथ दौरा; आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

पंतप्रधान मोदींचा केदारनाथ दौरा; आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ दौऱ्यावर आहेत. केदारनाथ येथे जाऊन पूजा करण्यासाठी आणि श्री आदी शंकराचार्य समाधीचे उद्घाटन कार्यक्रमासाठी मोदी दाखल झाले आहेत.

उत्तराखंडचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरुमित सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले असून पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी करण्यात आलीय.

दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिराची पूजा करण्यात आली त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण मोदी करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com