दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या पोषण आहाराच्या प्लॅस्टिक तांदळामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम

दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या पोषण आहाराच्या प्लॅस्टिक तांदळामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम

Published by :
Published on

संजय राठेड, यवतमाळ
अंगणावाडीच्या बालकांना पोषण आहार स्वरूपात धान्य वितरण करण्यात येते. बालकांना देण्यात येणारा तांदूळ प्लास्टीकचा असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

दिवाळीत देण्यात येणार तांदूळ घ्यायचा की नाही असा संभ्रम लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. हा फोर्टीफाइड तांदूळ असून, उत्कृष्टच असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. तांदूळ पोषक असून, पाण्यावर तरंगतो. त्याचा रंगही थोडा वेगळा आहे. नागरिकांत गैरसमज पसरत असल्याने क्षेत्रीय कर्मचार्‍यांना जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com