दारूड्या पतीची मारहाण, केस कापून पत्नीला विदृप करण्याचा प्रयत्न

दारूड्या पतीची मारहाण, केस कापून पत्नीला विदृप करण्याचा प्रयत्न

Published by :
Published on

पिंपरी चिंचवड शहरातून एक गंभीर बाब समोर आली आहे. गृहकलहामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीला मारहाण करून, तिला विद्रुप करण्याच्या उद्धेशाने पतीने तिचे केस कापल्याचा विकृतपणा उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे आपल्यावर पतिकडून झालेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी जेव्हा पीडिता पोलीस स्टेशन मध्ये गेली तेव्हा पोलिसांनी तिला पाच ते सहा तास थांबवून ठेवत तिचीच खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पतीने केस कापून मारहाण केल्यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसलाय.

दारुडा पती पैस्यांसाठी मारहाण करत असल्याने मागील दोन वर्षांपासून ती आईकडे राहते. मात्र काल आपल्या पतीने आपल्याला एकट बघून गाठलं आणि ओढत घरी नेऊन जबर मारहाण केली आणि केसही कापल्याच पीडित कोमलने दुःख व्यक्त केलं.

दरम्यान पत्नीला मारहाण करणारा नरेंद्र वाल्हेकर अजूनही मोकाट असल्याने पोलीस खरंच सर्व सामन्यांच्या सुरक्षेसाठी आहेत का? हा प्रश्नकुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com