Phd Paper Leak : सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Phd Paper Leak : सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपची प्रश्नापत्रिका आधीच फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.
Published on

पुणे : महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपची प्रश्नापत्रिका आधीच फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून आंदोलन सुरु केले आहे. पुणे आणि नागपूर या दोन विभागांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे.

Phd Paper Leak : सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय
ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडं जावं; लोकशाही पॉडकास्टमध्ये नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएचडी फेलोशिपसाठी राज्यातील 4 प्रमुख केंद्रांवर पात्रता परीक्षा घेण्यात आली. यातील पुणे आणि नागपूर या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने समोर आले आहे.

चार सेटपैकी 2 सेट C आणि D हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अशातच, पुणे विद्यापीठाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत प्रश्नसंच C व D सीलबंद नसल्याने परीक्षेत झालेल्या गैरकारभारामुळे पुणे विद्यापीठाकडून परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पीएचडी फेलोशिप पेपरफुटीप्रकरणी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. तर, शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com