पाकिस्तान समर्थन घोषणा प्रकरण, पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल
एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी पीफआय संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात त्यांचे कॅडर एकत्र आले होते. आंदोलना दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांकडून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर घोषणांचा व्हिडिओ प्रचंड व्हिडिओ झाला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देशद्रोहाचे नवीन कलम अॅड करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त यांना देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कलम 153, 124, 109, 120 ब... हे कलम नव्याने अॅड केले आहेत, व देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहिली काय होती एफआयआर?
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा घोषणा पीफआय कार्यकर्त्यांनी दिल्या असल्याचे नमूद केले होते. मात्र, प्रकरण तापल्यानंतर गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी देशद्रोहाचे कलम अॅड केले आहेत.