लग्न, वाढदिवसाच्या जेवणावळींसाठी FDAची परवानगी; आत्राम यांची माहिती

लग्न, वाढदिवसाच्या जेवणावळींसाठी FDAची परवानगी; आत्राम यांची माहिती

घरात लग्न, वाढदिवसासारखे कार्यक्रम असोत, की तेरवी किंवा महाप्रसाद, आता भोजनावळींसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे अनिवार्य केले जाणार आहे.
Published on

गडचिरोली : घरात लग्न, वाढदिवसासारखे कार्यक्रम असोत, की तेरवी किंवा महाप्रसाद, आता भोजनावळींसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे अनिवार्य केले जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज ही माहिती दिली. ते गडचिरोलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

घरात लग्न, वाढदिवसासारखे कार्यक्रम असोत, की तेरवी किंवा महाप्रसाद, आता भोजनावळींसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे अनिवार्य केले जाणार आहे. परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. भोजनादरम्यान अन्नाची गुणवत्ता राखली जावी आणि विषबाधेसारखे प्रकारे टाळले जावेत यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हंटलं आहे.

अशी परवानगी घेण्याचा कायदा आधीपासूनच आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, धर्मरावबाबा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय एफडीए विभागाच्या नवीन कार्यालयासाठी इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com