Megablock: प्रवाशांचे होणार हाल! मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Megablock: प्रवाशांचे होणार हाल! मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 4 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 4 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत रुळांची दुरुस्ती, सिग्नल प्रणाली आणि इतर यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेने मेन लाईनवर मुलुंड ते माटुंगा आणि हार्बर लाईनवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान मेगाब्लॉक घेतल्याचं जाहीर केलं आहे.

मध्य रेल्वे

कुठे: मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी: सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

परिणाम: या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुढे पुन्हा मूळ धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे: वसई रोड ते भाईंदर अप - डाऊन धीम्या मार्गावर

कधी: शनिवारी - रविवारी रात्री 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत

परिणाम: या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विरार/ वसई रोड से बोरीवली/ गोरेगांव रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

हार्बर मार्ग

कुठे: मानखुर्द ते वडाळा रोड अप व डाउन दोन्ही मार्गावर

कधी: सकाळी 11:00 ते 4:00 वाजेपर्यंत

परिणाम: ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा येथून वाशी/बेलापूर/ पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. त्यामुळे या ब्लॉक वेळेत पनवेल ते मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांना ट्रान्स हार्बर किंवा मेन लाईनवर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

Megablock: प्रवाशांचे होणार हाल! मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
Mumbai Rain: मुंबईचा आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com