Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
या रविवारी बाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (18 ऑगस्ट 2024) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वे
कुठे: ठाणे ते दिवादरम्यान
कधी: सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत
परिणाम: ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णतः बंद राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे: सांताक्रूझ गोरेगाव अप आणि डाऊन जलद
कधी: सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत
परिणाम: या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हार्बर रेल्वे
कुठे: सीएसएमटी,चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावर
कधी: सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत
परिणाम: या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.