मुलाच्या विवाहाच्या पूजेचे साहित्य विर्सजनासाठी गेलेल्या आई-वडिलांचा बुडून मृत्यू

मुलाच्या विवाहाच्या पूजेचे साहित्य विर्सजनासाठी गेलेल्या आई-वडिलांचा बुडून मृत्यू

वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील तरोडा येथील पतिपत्नी गावशेजारील साकुर्ली धाम नदीपात्रात कथेचे साहित्य फेकायला गेलेल्या पतीपत्नीचा नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

भूपेश बारंगे | वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील तरोडा येथील पतिपत्नी गावशेजारील साकुर्ली धाम नदीपात्रात कथेचे साहित्य विसर्जित करायला गेलेल्या पतीपत्नीचा नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आत्माराम कृष्णा बोरकर व पत्नी कुंदा आत्माराम बोरकर या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुलाचा विवाह पार पडला. त्यानंतर घरात सत्यनारायण (कथेची) पूजा पार पडली. त्या पूजेचे साहित्य फुल,हार, हातातील काकण,अक्षदा सोबत विवाहातील काही साहित्य नदीपात्रात विसर्जित करायला गेले होते. साकोली शिवारातील धाम नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. मात्र बोरकर पतिपत्नीला खड्ड्या कल्पना नसल्याने त्यांचा पाय घसरून खड्यात बुडाले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

25 मे ला मुलाचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. 15 दिवसानंतर पावसापूर्वी घरात पूजेचे साहित्य ठेवलेले खराब होईल यामुळे ते साहित्य नदीपात्रात नेऊन टाकावी यासाठी ते गेले असता त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. याघटनेची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असुन आकस्मिक मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे.

पुलाच्या बांधकामाचा सूचना फलकाचा पडला विसर

ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य विसर्जित करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी पुलाच्या बांधकामाकरिता खोल खड्डे करण्यात आले आहे.त्याठिकाणी अनुचित घटना घडू नये यासाठी कंत्राटदार यांच्याकडून सूचना फलक लावण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नदीपात्रात खोदलेल्या खड्ड्यात पूजेचे साहित्य फेकायला गेलेल्या पतिपत्नी पाय घसरून बुडाले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सूचना फलकाचा माहिती घेऊन पुजेचे साहित्य विसर्जित केले असते तर अशी अनुचित घटना घडली नसती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com