परभणी महापालिकेला पहिल्यांदाच मिळणार महिला आयुक्त; देविदास पवार यांची बदली

परभणी महापालिकेला पहिल्यांदाच मिळणार महिला आयुक्त; देविदास पवार यांची बदली

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून बदल्यांचे सत्र सुरू
Published on

खालिद नाझ | परभणी : परभणी महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होते. तृप्ती सांडभोर यांच्या रुपाने परभणी महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळणार आहेत.

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे सरकारने बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. आज परभणी महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या जागी पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबतचा अधिकृत आदेश आज काढला आहे. तृप्ती सांडभोर यांच्या रुपाने परभणी महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com