Omicron Corona | परभणी जिल्ह्यात नो वॅक्सिन,नो एन्ट्री, सर्व गेटवर चोख बंदोबस्त
खालेद नाज, परभणी | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरीएंट सापडला आहे. या नवा व्हेरीएंट जगभरासह भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. केंद्र व राज्य सरकारने या व्हेरीएंटचा धोका लक्षात सूचना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे संभाव्य धोका लक्षात घेता परभणी जिल्ह्यात उद्या मंगळवारपासून सर्व गेटवर चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच नो वॅक्सिन,नो एन्ट्री असा नियम असणार आहे.
परभणी जिल्हा प्रशासन देखील संभाव्य धोक्यासाठी सज्ज झाला. उद्यापासून परभणी जिल्ह्यातील सर्व आठ प्रमुख इंट्री पॉईंटवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून परभणीत दाखल होऊ पाहणाऱ्यांना आता RTPCR टेस्ट आणि वॅक्सिन शिवाय जिल्ह्यात एन्ट्री मिळणार नाही. शिवाय त्याच ठिकांनी लसीकरणची सुविधा ही मिळणार आहे असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.