‘फडणवीसांकडून संयम शिकावा’; पंकजा मुंडेंकडून कौतुक

‘फडणवीसांकडून संयम शिकावा’; पंकजा मुंडेंकडून कौतुक

Published by :
Published on

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयम ही शिकण्याची गोष्ट आहे…असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. मीही त्यांच्याकडून संयम शिकले आहे. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. असं यावेळी पंकजा म्हणाल्या. पेशन्स काय असते हे फडणवीस यांच्याकडून शिकले, पंकजा मुंडेंकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स ही शिकण्याची गोष्ट आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. त्या आष्टी नगरपंचायतच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये बोलत होत्या.

सुरेश धस आणि भीमराव धोंडे हे दोघे फडणवीस यांच्याकडे गेले होते. आणि 50 टक्के जागा मागितल्या होत्या. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांचं ऐकून घेतलं. मीही त्यांच्याकडून पेशन्स शिकले आहे. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं यावेळी पंकजा म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com