पंकजा मुंडेंकडून रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा

पंकजा मुंडेंकडून रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा

Published by :
Published on

आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा केला जातोय.भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज रक्षाबंधनानिमित्त सर्व बहीण-भावांना खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.ज्यांना पंकजा मुंडेंकडून राखी बांधून घ्यायची होती, परंतु ते शक्य झालं नाही. अशांसाठी व सर्व माता-भगिनींसाठी देखील पंकजा मुंडे यांनी विशेष संदेश दिला आहे.सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या व्हिडीओमध्ये म्हणतायत,"नमस्कार, राखी पोर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या छोट्याशा बहिणीला, मोठ्या आईसारख्या बहिणीला, आपल्या भावाला, ज्यावर आपण मुलासारखं प्रेम करतो किंवा एखादा मोठा भाऊ ज्याला आपण वडिलाप्रमाणे आदर देतो. त्या सगळ्यांना आज आपल्याला खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात. खूप प्रेम दाखवावं वाटतं, असा आजचा दिवस आहे".

"आज खुप जणांच्या माझ्याकडुन राख्या बांधून घ्यायच्या इच्छा होत्या.तर ते लोक माझ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत.किंवा मी राखी बांधण्यासाठी वेळ दिला नाही, याचं कारण की ज्या बहीणीने तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवल,त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क आहे. मी त्यांना राखी बांधावी. इतक्या लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली की मला आज असं वाटतंय की मी किती भाग्यवान आहे".असं पंकजा मुंडे म्हणाल्या

"सर्व माता-भगिनींना हीच विनंती आहे. की तुमच्या भावांकडून आजच्या दिवशी असं काही वचन घ्या, सगळ्या स्त्री जातीचा आदर त्यांनी करावा, स्त्रीकडे आदराने बघावं, स्त्रीला सुरक्षा, सन्मान द्यावा अशाप्रकारचा शब्द नक्कीच त्यांच्याकडू ओवाळणीत घ्या." असं पंकजा मुंडे शेवटी म्हणाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com