Pandharpur Bypoll : अखेर निवडणूक संपन्न… पंढरपुरात ६८ टक्के मतदान

Pandharpur Bypoll : अखेर निवडणूक संपन्न… पंढरपुरात ६८ टक्के मतदान

Published by :
Published on


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीत ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. कोरोनाच्या संकटातही लोकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अखेरच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला तरी कोठेच रांगा नाहीत हे विशेष आहे. त्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण हे लवकरच स्पष्ट होईल

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र थेट लढत ही भाजप राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात संचारबंदी लागू असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला यातून सूट देण्यात आली आहे. निवडणुकीमुळे याठिकाणी मतदान होईपर्यंत संचारबंदी लागू नसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com