झोपडपट्ट्यांमधून कुठल्याही खबरदारीविना होतेय RT-PCR टेस्टिग स्वॅब किटचे पॅकिंग
खेमानी झोपडपट्टी भागात चक्क कोरोना आरटीपीसीआर टेस्टिंग स्वैब स्टिक बनविण्यात येत असल्याचे उघड झाले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी पोलिसा समवेत परिसराची पाहणी करून अन्न औषध व प्रशासन विभागाला कारवाई करण्याचे संपर्क साधून सुचविले आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प नं-३ परिसरातील खेमानी ज्ञानेश्वरनगर मधील काही झोपडपट्टीच्या घरात चक्क कोरोना महामारी काळात आरटीपीसीआर टेस्टिंग स्वैब स्किट कोणत्याही सुरक्षा विना पॅकिंग केली जात असल्याचे उघड झाले. अश्या आरटीपीसीआर टेस्टिंग स्वब स्किटच्या वापराने कोरोना चाचणी योग्य येणार का? असा प्रश्न केला जातो. दरम्यान याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महापालिकेच्या अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी सदर प्रकारची दखल घेऊन बुधवारी दुपारी पोलिसा सोबत परिसराची पाहणी केली. तसेच येथे बनविण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्वब स्किटचा वापर आपल्या शहरात केला जात नसल्याची प्रतिक्रिया दिली.