उस्मानाबाद चिंचपूर ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न

उस्मानाबाद चिंचपूर ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

महिला सबलीकरण करण्यासाठी समाजात कार्यक्रम राबवले जातात. अशातच उस्मानाबाद चिंचपूर ग्रामपंचायतीने पुरूषांच्या राखीव जागेवर महिला सदस्याला निवडून आणून समजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रूक गावाने सरपंच पद पुरूषांसाठी राखीव होते परंतु या गावाने एकमताने गावाचा कारभार महिलेच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकताच प्रियंका पोपट शिंदे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर उपसरपंच पदी द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही महिलांना कोणतीही राजकीय पाश्वभूमी नसताना केवळ त्याच्या कर्तुत्वावर गावाने एकमताने गावाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला. काल या दोघींनीही सावित्रीबाई फुलेंच्या वेशात त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी गावकर्‍यांनी फुलांच्या पायघड्या घालुन त्यांची गावभर मिरवणूक कडून त्यांचे जल्लोषांत स्वागत केले. चिंचपूर गावाचा हा महिला सबलीकरणाचा हा पॅटर्न समाजासाठी आदर्श ठरतो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com