आरेमधील वृक्षतोडीला विरोध आणि दानापाणीत वृक्षतोड; शिवसेनेचं बेगडी पर्यावरणप्रेम उघड

आरेमधील वृक्षतोडीला विरोध आणि दानापाणीत वृक्षतोड; शिवसेनेचं बेगडी पर्यावरणप्रेम उघड

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

गोरेगावच्या आरे कॉलनीत वृक्षतोड झाल्यावर शिवसेना भाजपावर तुटून पडली होती. मात्र, आता सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारच्या काळात मालाडच्या दानापाणी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना केवळ पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणते का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मालाडमधील दानापाणी या भागात पर्यटकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे हा भाग पर्यटकांच्या दृष्टीने विकसित करण्यात यावा, यात दुमत नाही. मात्र, विकासाच्या आडून इथे वृक्षांची कत्तल होत असेल तर हा सरकारचा दुटप्पीपणा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. एवढंच नाही तर या ठिकाणी वृक्षतोड करताना परवानगी घेतली आहे का ? कोणाच्या आदेशाने ही कारवाई होते आहे ? लोकांना पडलेल्या आशा अनेक प्रश्नानाची ठाकरे सरकार उत्तर देणार का ? हे पाहणं महत्वाच आहे.

या परिसरात आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की, या ठिकाणी वृक्षतोड करून त्यावर भर टाकण्याच काम देखील करण्यात आलं आहे. मालाड हा तसा काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यांच्यातील कोणत्या मंत्राचा त्यांना आश्रय आहे का? याचा देखील विचार करणं महत्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com