तेजस एक्स्प्रेसमध्ये केवळ इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध; मराठी वृत्तपत्र मिळेना

तेजस एक्स्प्रेसमध्ये केवळ इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध; मराठी वृत्तपत्र मिळेना

तेजस एक्स्प्रेसमध्ये वाचनप्रेमींसाठी केवळ इंग्रजी वृत्तपत्र असून मराठी वृत्तपत्र वाचण्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तेजस एक्स्प्रेसमध्ये वाचनप्रेमींसाठी केवळ इंग्रजी वृत्तपत्र असून मराठी वृत्तपत्र वाचण्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवे होते. मात्र, तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नव्हते.

याच पार्श्वभूमीवर आता नितीन सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन सरदेसाई म्हणाले की, मी आता मुंबईतून मडगाव असा रेल्वेने प्रवास करत होतो. मी रत्नागिरीला जात आहे. रेल्वे प्रशासन इथे सर्व इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्यासाठी ठेवले आहेत. मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नाही. मी याबाबत रेल्वे प्रशासन यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मुंबईतून जी ट्रेन बाहेर जाते त्यात मराठी वर्तमानपत्र असणे आवश्यक आहे. असे नितीन सरदेसाई म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com