चंपाशष्टी निमित्त मनमाडमध्ये रंगल्या रेड्याच्या झुंजी…

चंपाशष्टी निमित्त मनमाडमध्ये रंगल्या रेड्याच्या झुंजी…

Published by :
Published on

संदीप जेजुरकर मनमाड ( नाशिक ) : दरवर्षी प्रमाणे यंदाही चंपाषष्टी निमित्त मनमाडमध्ये रेड्यांच्या झुंजी रंगल्या आहेत. यात विजयी झालेल्या रेड्याच्या मालकाला मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात आले. तर या झुंजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी जमली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही चंपाषष्टीला मनमाडमधील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर रेड्यांच्या झुंजी आयोजित करण्यात आल्या. गवळी समाज आणि दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून झालेल्या या रेड्यांच्या झुंजी चांगल्याच रंगल्या. खरे तर भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर रेड्यांच्या टकरी घेण्यात येतात. त्यावेळी बाहेरगावचे रेडा मालक आपले रेडे झुंज लावण्यासाठी घेऊन येत असतात.

चंपाषष्ठीनिमित्त आज झालेल्या झुंजीसाठी केवळ मनमाड शहरातील रेड्यांची टक्कर लावण्यात आली,यात विजयी झालेल्या रेड्याच्या मालकाला मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात आले.नेहमी प्रमाणे या झुंजी पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये मोठी गर्दी झाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com