रोहित पवारांच्या ED चौकशीच्या दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार

रोहित पवारांच्या ED चौकशीच्या दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली. बारामती अ‍ॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, #ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे.

मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!

तसेच माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय! असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com