गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 100 परिचारिकांचं ‘कामबंद आंदोलन’

गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 100 परिचारिकांचं ‘कामबंद आंदोलन’

Published by :
Published on

राज्य परिचारिका संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकरालं असून विविध मागण्यांसाठी परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत.

जुनी पेन्शन लागू करावी, केंद्रप्रमाणे वेतन द्यावं, नवी पदभरती करावी, यासाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयातील  शंभरावर परिचारिका यात सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनामुळे रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली असून सद्यस्थितीत एकही परिचारिका रुग्णसेवेत नसल्यानं ऐन कोविड काळात मोठी समस्या निर्माण झाली आहे.

रुग्णांची हेळसांड होऊ नये, याची काळजी असली तरी शासनाला जाग येत नसल्यानं हे आंदोलन नाईलाजानं करावं लागत असल्याचं या परिचरिकांचं म्हणणं आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मागण्या शासनदरबारी मांडत आहोत. पण त्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com