Coronavirus | तूर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध; अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय
कोरोनाने जगभरात धूमाकुळ घातला आहे. यातच आता ओमायक्रॉनचे नवीन संकट आलं आहे. तूर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लागू करणार. आज रात्री नियमावली जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंत्रालयातील अजित पवारांची बैठक संपली असून रात्री नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. उपपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.