नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम

नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम

Published by :
Published on

नाशिक शहरात आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम नाशिककरांच्या फायद्याचेच आहे. 15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात नो हेल्मेट, नो पट्रोल ही मोहीम राबवण्यात येणार आहे. दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.


नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत असून एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये असे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com